Onion Market Price: राज्यातील विविध बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात अलीकडे मोठी घसरण झाली होती. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला होता. दरम्यान राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसत आहे. दरम्यान कांद्याचे दर स्थिर असल्याचे चित्र दिसत आहे. ग्राहकांना दिलासा मिळण्याचे चित्र असले तरी शेतकऱ्यांसाठी ही स्थिती हवालदिल करणारी ठरत आहे. वाढलेले उत्पादन साठवणूक कितीला मर्यादा आणि पुरवठा अधिक झाल्याने बाजारात कांद्याचे दर कोसळले असून त्याचा थेट फटका शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला बसत आहे.
हे पण वाचा | लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची बातमी! मे महिन्याचा हप्त्या या दिवशी जमा होणार? वाचा सविस्तर
नाशिक सोलापूर अहमदनगर तसेच मध्य पदेशातून उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत असल्याने कांद्याचे बाजार दर घसरले आहेत. सध्या कांदा प्रतिक्विंटल 800 ते 1700 रुपये दरम्यान विकला जात आहे. काही भागात उत्पन्न खर्च देखील भरून निघत नसल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान कांद्याच्या घटत्या दरामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. एका एकर कांद्याच्या उत्पादनासाठी 30 ते 35 हजार रुपये खर्च येतो. मात्र बाजार भाव केवळ 1000 ते 1200 रुपये प्रति क्विंटल असल्याने तोट्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते. अशी व्यथा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे त्यामुळे अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले असल्याचे समोर आले आहे.
हे पण वाचा | लाडक्या बहिणींना आता मिळणार 40 हजार रुपये कर्ज; अजित पवारने केली मोठी घोषणा..
केंद्र सरकारने 1 एप्रिल 2025 पासून कांद्यावरील 20% निर्यात शुल्क रद्द केल्यामुळे बाजारपेठेत सुधारणा होईल अशी अपेक्षा होती. मात्र भारत पाकिस्तान मधील तणावामुळे निर्यात बंदी व बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेमुळे निर्यातीची मोठी घट झाली आहे. परिणामी दर स्थिर होण्याऐवजी आणखीन घसरल्याचे चित्र दिसत आहे. नवी मुंबई बाजारात दररोज 100 ते 150 गाड्याद्वारे कांद्याचे आवक होत आहे. यामुळे चांगल्या प्रतीचा कांदा सध्या बाजारात केवळ दहा ते पंधरा रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. दोन महिन्यापूर्वी हेच कांद्याचे दर 35 ते 40 रुपये प्रति किलो एवढे होते. तर दुसऱ्या प्रतीचा कांदा एक ते पाच रुपये प्रति किलो रुपयांनी विकला जात आहे.
दरम्यान व्यापाऱ्यांच्या अंदाजानुसार पुढील 15 ते 20 दिवस कांद्याचे दर असेच राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर कांद्याच्या दरामध्ये काही सुधारणा होण्याची अपेक्षा वर्तवली जात आहे. सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय बिकट आणि वाईट झाली आहे. केंद्र सरकारने वेळेत निर्णय घेतला असता तर आज ही स्थिती निर्माण झाली नसती. सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थायी निर्णय धोरण ठेवावे त्यासाठी समिती स्थापन करावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने केली जात आहे. Onion Market Price
1 thought on “Onion Market Price: कांद्याची आवक वाढली! जाणून घ्या कांद्याचे बाजार भाव..”