Crop Insurance Claim: राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यासाठी केंद्र सरकार अंतर्गत व राज्य सरकार अंतर्गत पिक विमा योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, पावसाचा खंड, रोगराई अशा अनेक कारणामुळे शेतकऱ्याच्या उत्पादनात झालेल्या घटनेचा मोबदला दिला जातो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या पिकाची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने करावी लागते. तुमच्या पिकाची नोंदणी झाल्यानंतर त्या पिकाचे नुकसान झाल्यावर काढणी दरम्यान त्याचा सर्वे केला जातो त्यानंतर पिक विमा शेतकऱ्यांना दिला जातो. दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पिक विमा वाटपास सुरुवात झालेली आहे.
हे पण वाचा | शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! यावर्षी महाराष्ट्रात मान्सून या तारखेपासून सुरू होणार…
राज्यातील या जिल्ह्यांमध्ये गेल्या सहा महिन्यापासून मागील खरीप हंगामातील नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 159 कोटी रुपयांचा पिक विमा नुकसान भरपाई मिळाली आहे. जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे रक्कम जमा झालेले आहे. पिक विम्याची रक्कम मशागतीच्या काळामध्ये मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण दिसत आहे. यंदाच्या खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी शेतकऱ्यांना या रकमेची मोठी मदत होत आहे.
प्रधानमंत्री खरीप पिक विमा योजनेतून गेल्या हंगामात पुणे विभागाला 283 कोटी रुपये मंजूर झाले होते. त्यानुसार या 283 कोटी पैकी अहिल्यानगर जिल्ह्याला 159 कोटी 21 लाख 84 हजार 424 रुपये मंजूर झाले होते. त्यामध्ये नेवासा तालुक्यात 31 हजार 44 हेक्टर क्षेत्रावरील पिकाच्या नुकसानीसाठी 44,243 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 46 कोटी 52 लाख 21 हजार 338 रुपये पिक विमा मंजूर झाला होता. यातील 90% रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहे.
हे पण वाचा | पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेत फक्त 5 वर्षात मिळतील 18 लाख रुपये; वाचा सविस्तर..
अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यात गेल्या हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या 3842 हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान भरपाई म्हणून 6757 शेतकऱ्यांना एक कोटी 62 लाख 27 हजार 584 रुपये नुकसान भरपाई मिळाली आहे. या व्यतिरिक्त स्थानिक नैसर्गिक आपत्तीमधून देखील दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठी मदत देण्यात आली आहे. जिल्ह्यात सर्वात अधिक लाभ हा नेवासा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळालेला आहे.
नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांना 46 कोटी पेक्षा जास्त रक्कम पिक विमा नुकसान भरपाई म्हणून मिळाली आहे. या तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा झालेली आहे. उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही लवकरच पिक विम्याची रक्कम विमा कंपन्याकडून देण्यात येणार आहे. Crop Insurance Claim
हे पण वाचा | या लाडक्या बहिणींना मे महिन्यात 3,000 रुपये मिळणार; तुम्हालाही मिळणार का? जाणून घ्या सविस्तर
तालुका | रक्कम |
जामखेड | 70476058 |
कर्जत | 14189033 |
पारनेर | 8035323 |
पाथर्डी | 139640272 |
श्रीगोंदा | 62655439 |
अकोला | 7701616 |
कोपरगाव | 106280313 |
अहिल्यानगर | 44741546 |
नेवासा | 465221338 |
राहाता | 710412691 |
राहुरी | 170412691 |
संगमनेर | 18175222 |
शेवगाव | 315378770 |
श्रीरामपूर | 100589864 |