सावधान! पुढील 4 तास महत्त्वाचे या भागात होणार मुसळधार पाऊस लवकर पहा अंदाज


Weather latest updates : महाराष्ट्राचा हवामान सध्या क्षणाक्षणाला बदलत आहे. एकीकडे उन्हाचा तडाका शिगेला पोहोचला असताना दुसरीकडे काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे. येतच हवामान विभागाने दिलेला अलर्ट अधिक धोक्याचा दिसतोय. भारतीय खात्याने दिलेल्या ताज्या अपडेट नुसार, रायगड जिल्ह्यासाठी पुढील तीन ते चार तासात अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. या भागामध्ये विजांचा आणि वादळी वाऱ्यांचा जोरदार इशारा असल्याचे भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. नागरिकांना शक्यतो घरात राहाव, सुरक्षित स्थळी आश्रेय घ्यावा आणि विजांच्या कडकडाट मोबाईल वापरणे, झाडाखाली थांबणं किंवा मोकळ्या जागेत फिरणे टाळावं असं आव्हान करण्यात आलेला आहे. Weather latest updates

राजगड मध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिलेला असताना, पालघरच्या किनारपट्टीला वादळी वाऱ्यांचा जबरदस्त तडाका बसला आहे. समुद्रावर भरकटलेल्या वाऱ्यांमुळे सुमारे 40 ते 45 बोटी संकटात सापडल्या आणि त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. डहाणू आणि पालघर भागात मच्छीमारांचं अतोनात नुकसान झालं असून प्रशासनाने पंचनामांचा काम सुरू केलं आहे. या भागात समुद्र अजून एक खवळलेला आहे, त्यामुळे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा आवाहन करण्यात आल आहे.

धुळे जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे चिंता वाढवली आहे तर बीड जिल्ह्यामध्ये देखील पावसाने हजेरी लावली असून अनेक ठिकाणी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची मोठी धावपळवलेली आहे. अनेक ठिकाणी गहू, हरभरा, मका ही काढणीला आलेले पिक पावसामुळे भिजून निघाले आहेत. उन्हाळी कांदा लागवड यंदा मोठ्या प्रमाणावरती झाली होती, मात्र अवकाळी पावसामुळे कांदा सडून जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे. हवामान विभागाने पुढील दोन ते तीन दिवसात अवकाळी पावसाचा इशारा दिल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, अरबी समुद्रात दीड किलोमीटर उंचीपर्यंत घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरणाऱ्या प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यांच्या स्थितीमुळे राज्यात वाऱ्याचा जोर वाढला आहे. विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात ताशी 40 ते 50 किमी वेगाने आद्रता युक्त उत्तरी वारे वाहत आहेत. यामुळे वातावरणात झपाट्याने बदल होत असून सध्या रात्रीच्या उकड्यात फारसा बदल नाही, पण वाऱ्यांमुळे गारवा जाणवत आहे.

या सगळ्या पार्श्वभूमी वरती शेतकरी, मच्छीमार, आणि सर्वसामान्य नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी शक्यतो पिके सुरक्षित स्थळी ठेवावे, कांद्याचे योग्य नियोजन करावं आणि प्रशासनाकडून मदतीसाठी तातडीने संपर्क साधावा.

राज्यात हवामान बदल हे फक्त एक नित्याचे चित्र बदलत चालले आहे. त्यामुळे हवामानाच्या प्रत्येकी शहराकडे गांभीर्याने पाहणं आणि वेळेवर सावध होणं हाच आपला सुरक्षितेचा एकमेव पर्याय आहे.

हे पण वाचा | भारतीय हवामान खात्याचा मोठा अंदाज; राज्यावरती दुहेरी संकट!

Leave a Comment

error: Content is protected !!