Weather updates : देशभरामध्ये पावसाचा थैमान! 10 जणांचा मृत्यू तर अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत

Weather updates : देशभरात  अवकाळी पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली असून काही राज्यांमध्ये वादळ आणि विजांमुळे जनजीवन विस्कळी झालेला आहे. या पार्श्वभूमीवरती अनेक ठिकाणी मोठी जीवितहनी झाल्याचे समोर आलेला आहे सर अनेकांना त्यांचे स्वतःचे घर सोडावे लागले आहे. खरतर अशा परिस्थितीमध्ये सरकारने मोठा हातभार लावणे गरजेचे आहे. दिल्ली एनसीआर मध्ये उत्तर प्रदेश आणि छत्तीसगड मध्ये वादळी वाऱ्यास मुसळधार पावसाचा कहर पाहिला मिळाला आहे.  हवामानात बदल झाल्यामुळे दहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, शंभरहून अधिक विमानांचे मार्ग बदलावे लागले आहेत. हवामान खात्याने अजूनही अनेक राज्यांसाठी इशारी जारी केलेले आ हे. Weather updates

गुरुवारी रात्रीपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यांमुळे दिल्ली एनसीआर मध्ये प्रचंड गोंधळ उडाला आहे. रस्त्यांवर झाडी पडली, तर अनेक भागांमध्ये पाणी साचले आणि विजांच्या झटक्याने चार जणांचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशात सुद्धा विजेचे झटक्याने 4 जन तर  दगावले. तर छत्तीसगडमध्ये दोन नागरिक जीव गमावला. दिल्लीच्या द्वारका भागात एका घरावर झाड पडून एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आई व तीन लहान मुलं, तर पती गंभीर जखमी झाला आहे.

या विचित्र हवामान स्थितीमुळे दिल्ली विमानतळावर उड्डाणवर मोठा परिणाम झाला आहे. तब्बल शंभरहून अधिक फ्लाइट्स उशिरा झाल्या तर तीन विमानांचे मार्ग बदल केले आहे.

तर राजस्थान जयपुर जैसलमेर भीलवाडा आणि पालिया भागात वादळीवार सह गारपीट झाली. पश्चिम बंगालच्या संदकफु भागात पुन्हा एकदा बर्फ वृष्टी पाहायला मिळाली. पण जम्मू मध्ये मुसळधार पाऊस उकाड्यातून दिलासा देणारा झाला आहे. हवामान खात्याने पुढील तीन दिवस काही ठिकाणी गारपीट तर काही ठिकाणी उष्णतेची लाट इशारा दिलेला आहे.

राज्यातील नागरिकांनी या हवामान खात्याचा विषय आढावा घ्यायचा आहे आकाशात विजा चमकत असल्यास घराबाहेर न पडणे, ओल्या जागेंपासून दूर राहणे, झाडाखाली थांबून टाळला. शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्या शेतीकामांसाठी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन योग्य नियोजन करायचे आहे.

हे पण वाचा | हवामान खात्याची मोठी अपडेट! या भागात मुसळधार पावसाचा इशारा

Leave a Comment

error: Content is protected !!