Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रातील लाखो लाडक्या बहिणींची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये लवकरच महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहेत. अक्षय तृतीया निमित्त बहिणींना हा आनंदाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे सर्व महिलांच्या चेहऱ्यावरती पुन्हा एकदा हास्य फुलणार आहे.Ladki Bahin Yojana
लाडक्या बहिणीसाठी महाराष्ट्र सरकारने 28 जून 2024 आणि 3 जुलै 2024 रोजी घेतलेल्या शासन निर्णयानुसार, मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती. महायुती सरकारच्या यशात या योजनेला मोठी भूमिका बजावली, जुलैपासून मार्चपर्यंतच्या नऊ महिन्यांमध्ये सरकारने प्रत्येक पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात एकूण 13,500 रुपये थेट जमा केलेले.
आता एप्रिल महिन्याचा हप्ता देण्याची वेळ आली आहे. सरकारने जाहीर केला आहे की अक्षय तृतीय दरम्यान म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये महिलांच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा केला जाईल. त्यामुळे ज्या बहिणी आतुरतेने वाट पाहता आहेत त्यांचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे.
या योजनेअंतर्गत काही महिलांना pm kisan सन्माननिधी आणि Namo Shetkari महा सन्मान निधी योजनेतून लाभ मिळत आहे अशा लाभार्थ्यांना मुख्यमंत्री लाडके बहिण योजनेतून केवळ ₹500 रुपयेच मिळणार आहेत. राज्यात अशा महिलांची संख्या 774,148 आहे.
महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितले की, या योजनेतून एकूण लाभार्थी दोन कोटी 47 लाख आहेत. ऑक्टोबर 2024 मध्ये जेव्हा लाभ देण्यात आला होता तेव्हा लाभार्थ्यांची संख्या दोन कोटी 33 लाख होती. म्हणजे गेल्या काही महिन्यात या योजनेच्या मोठ्या प्रमाणावर नवीन पात्र बहिणी जोडल्या गेल्या आहेत.
सरकारच्या वतीने महिला व बालविकास विभाग सातत्याने प्रयत्न करत आहे की, लाडक्या बहिणींना वेळेत आणि सुरळीत पैसे मिळावेत. बँकिंग अडचणी, आधार लिंकिंग मधील तांत्रिक घोळ, कागदपत्र यासारख्या समस्यावरती विशेष टीमकडून काम सुरू आहे. ज्या मैदानी योग्य नोंदणी केली आहे त्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील, असेही अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.
आता फक्त काही दिवसांची वाट पहावी लागणार आहे, जेव्हा एप्रिलचा हप्ता खात्यात जमा होईल तेव्हा अनेक बहिणींच्या घरातल्या गरजांवर हातभार लागेल. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाचा सर्वत्र स्वागत होत आहे.
हे पण वाचा | लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! या महिलांना मिळणार नाही एप्रिल महिन्याचे 1,500 रुपये; कारण काय?