Ladki Bahin Yojana Update: राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकार अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या “मुख्यमंत्री लाडकी बहीण” योजने संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आलेले आहे. हाती आलेल्या नवीन अपडेट नुसार आता पुन्हा एकदा नव्याने पात्र ठरलेल्या महिलांसाठी पुन्हा अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. याकडे सर्व महिलांचे लक्ष लागू राहिले आहे. महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी वरती ही योजना मोठ्या धुमधडाक्यात जाहीर केली होती. २८ जून 2024 रोजी या योजनेची महत्वाची घोषणा केली. एक जुलै 2024 पासून योजना सुरू करण्यात आली या योजनेचा कालावधीत जवळपास 2.47 कोटी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.Ladki Bahin Yojana Update
मात्र या कालावधीनंतर अनेक महिलांनी वयाची 21 वर्षे पूर्ण केली असून, त्या आता योजनेसाठी पात्र ठरत आहे. शिवाय, काही महिलांचे अर्ज तांत्रिक कारणामुळे ना मंजूर झाले होते. त्यामुळे त्यांना पुन्हा अर्ज करण्याची एक संधी मिळावी अशी मागणी जोर धरू लागली होती. मात्र, सध्या अर्ज प्रक्रिया बंद असल्यामुळे या महिलांना योजनेचा लाभ मिळाला की नाही, याबाबत संभ्रम आहे. यावर लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय होण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे.
13 लाख महिलांचे अर्ज अपात्र, तपासणी प्रक्रिया सुरू!
योजनेत आतापर्यंत राज्य सरकारने तब्बल 36000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. परंतु योजनेतील अर्ज छाननी दरम्यान 13 लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आलेले आहे. हे अर्ज अपात्र का ठरवले याची चौकशी सध्या सुरू आहे. प्राप्त कर विभागाकडून काही महिलांची आर्थिक माहिती गोळा केली जात आहे, कारण काही प्रकरणांमध्ये महिलांनी चुकीची माहिती दिल्याचे निदर्शनात आले. त्यामुळे सरकार सर्व अर्जांची बारकाईने छाननी करत असून पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ व्हावा हे सरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे.
नव्या अर्ज प्रक्रियेकडे महिलांचे लक्ष
अनेक तरुण महिलांनी 15 ऑक्टोबर 2024 नंतर वयाची 21 वर्षे पूर्ण केलेली आहे. शासन निर्णयानुसार ही वयोमर्यादा पूर्ण करणाऱ्या महिलांना अर्ज करता येतो. मात्र अर्ज प्रक्रिया बंद असल्यामुळे त्या अर्ज करू शकले नाहीत. तसेच, ज्यांचे अर्ज आदि नाकारण्यात आले होते, त्यांना पुन्हा एकदा दुसरी संधी द्यावी अशी मागणी केली जात आहे. यावर निर्णय घेण्यासाठी लवकरच मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात येणार आहे, आणि त्यात अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यावर चर्चा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
सामूहिक प्रगतीसाठी नव्हे पाऊल
या योजनेचे माध्यमातून केवळ आर्थिक मदत न देता, त्यांना समूहिक विकासासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. काही स्वयंसहायता गटांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वतंत्र योजना राबवण्याचा विचार सरकार करत आहे. महिलांनी मिळालेला निधीचा योग्य वापर व्यवसायासाठी, शिक्षण, कौशल्य विकास यासाठी व्हावा, यासाठी मार्गदर्शक तत्वे सरकार तयार करत आहे. ही योजना नेमकं कधी आणि कशा स्वरूपात लागू होणारी अद्याप पोस्ट करण्यात आलेली नाही. पण याबाबत लवकर निर्णय होणार आहे.
महिला मंत्री आदित्य तटकरे यांच्या स्पष्टीकरण
महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की, सध्या कोणतेही निर्णय झालेले नाही. शासन निर्णयानुसार अर्ज प्रक्रियेची मुदत संपली आहे. मात्र, नव्याने अर्ज स्वीकारायचे का, याबाबत निर्णय मंत्रिमंडळ घेईल, त्यामुळे सध्या कोणतीही हालचाल नाही, असही त्यांनी स्पष्ट केलेला आहे. पण नव्याने पात्र ठरणाऱ्या महिलांना लाभ द्यावा, त्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
गावा गावातील महिलांनी या योजनेतून मिळालेल्या हजार रुपयांचा लाभ गरजेच्या वेळी उपयोगात आणला. काही नाही किराणा सामान घेतलं, तर काहींनी मुलांच्या शिक्षणासाठी बचत केली. त्यामुळे ही योजना केवळ राजकीय नव्हे, तर सामाजिक दृष्ट्या फार मोठी ठरली आहे. आता नव्याने अर्ज करण्याची संधी मिळावी, यासाठी लाखो महिला प्रतीक्षेत आहे. आगामी मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा | लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! या महिलांना मिळणार नाही एप्रिल महिन्याचे 1,500 रुपये; कारण काय?