India Post GDS 2nd Merit List 2025 : भारतीय डाक विभागाने (India Post) ग्रामीण डाक सेवक (GDS) भरती संदर्भात २०२५ साठी दुसरी मेरिट लिस्ट यादी अधिकृतपणे जाहीर केलेली आहे. ची यादी राज्यनिहाय स्वरूपात अधिकृत वेबसाईट वरती उपलब्ध करण्यात आलेली आहे. ज्यांच्या नावांचा समावेश यादीमध्ये आहे त्यांना आता त्यांच्या संबंधित सर्कलमध्ये सरकारी नोकरी मिळणार आहे यासाठी पडताळणी प्रक्रिया करण्यासाठी बोलावण्यात येणार आहे.India Post GDS 2nd Merit List 2025
ही भरती ग्रामीण डाक सेवक (GDS), शाखा पोस्टमास्टर (BPM), व सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर (ABPM) या पदांसाठी करण्यात येत आहे. एकूण 21,413 पदांसाठी ही भरती मोहीम राबवण्यात आली आहे.
कोणत्या उमेदवारांसाठी आहे ही संधी?
ज्या उमेदवारांनी 10 फेब्रुवारी 2025 ते 3 मार्च 2025 या कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज भरले होते, आणि ज्यांचे नाव पहिल्या मेरिट लिस्ट मध्ये नव्हते, त्यांच्यासाठी ही दुसरी यादी एक महत्त्वाची संधी ठरू शकते. जर तुम्ही देखील या भरतीसाठी अर्ज केला असेल आणि पहिल्या यादी तुमचं नाव नव्हतं. तर आता दुसरी यादी तपासून खात्री करा की तुमचं नाव त्यात आहे की नाही.
निवड प्रक्रिया कशी असते?
India Post GDS भरती प्रक्रियेमध्ये कोणत्याही परीक्षेचा समावेश नाही. उमेदवारांनी अर्ज करताना भरलेल्या दहावीच्या हक्का आणि निवडलेला सर्कल (Circle/राज्य) यावर आधारित मेरिट लिस्ट तयार केली जाते.
दुसऱ्या यादीच्या उमेदवारांचे नाव आहेत, त्यांना त्यांच्या सर्कल प्रमाणे संबंधित कार्यालयाकडून मूल कागदपत्र पडताळणीसाठी संपर्क केला जाणार आहे.
India Post GDS मेरिट लिस्ट कशी डाउनलोड कराल?
जर तुम्ही अर्ज केला असेल तर खालील प्रमाणे तुम्ही दुसरी मेरिट लिस्ट तपासू शकता
- अधिकृत वेबसाईटवर जा indiapostgdsonline.gov.in
- होम पेजवर “Shortlisted Candidates” विभाग शोधा
- त्यात “2nd Merit List 2025” लिंक वर क्लिक करा.
- तुमच्या राज्याचे नाव निवडा आणि पीडीएफ डाऊनलोड करा.
- पीडीएफ मध्ये तुमचं नाव, रोल नंबर आणि सर्कल तपासा.
India Post GDS भरतीची दुसरी यादी अनेक उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. परीक्षा न घेता दहावीच्या गुणांच्या आधारे ही भरती प्रक्रिया असल्याने अधिक गुण असलेल्या उमेदवारांना सरकारी नोकरी मिळणार आहे. जर तुमचं नाव गाजत आहे तर वेळ न घालवता तुमची मूळ कागदपत्र तयार ठेवा आणि पडताळणीसाठी तयार राहा.
हे पण वाचा |इंडिया पोस्ट ऑफिस मध्ये डाक सेवक पदांसाठी 21,413 जागांची भरती; अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा