Senior Citizen Savings Scheme : आजच्या काळात निवृत्त झाल्यावर आर्थिक सुरक्षिता राखणे हे अनेक ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठे आव्हान बनला आहे. महागाईने कंबर मोडले, तर बँक एफडीचे व्याजदर काही खास नाहीत. अशा परिस्थितीमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्ट ऑफिस ची वरिष्ठ नागरिक बचत योजना (Senior Citizen Savings Scheme) ही एक उत्तम पर्याय ठरू शकते. या योजनेद्वारे तुम्ही सुरक्षित गुंतवणुकीतून नियमित उत्पन्न मिळू शकता आणि विशेष म्हणजे, फक्त व्याजातून तुम्ही 12 लाखाहून अधिक कमाई करू शकता.
SCSS म्हणजे काय ?
वरिष्ठ नागरिक बचत योजना ही केंद्र सरकार द्वारे चालवली जाणारी एक विशिष्ट योजना आहे. यामध्ये तुम्ही एकदाच गुंतवणूक करता आणि प्रत्येक महिन्याला ठराविक दराने व्याजदर मिळते. या योजनेमध्ये 8.2% दराने वार्षिक व्याज दिलं जातं. ही योजना पाच वर्षासाठी असते, आणि हवे असल्यास अजून तीन वर्षांनी वाढवता येते.
किती गुंतवणूक वर किती व्याज मिळेल?
जर तुम्ही या योजनेमध्ये कमाल मर्यादा म्हणजे 30 लाख रुपये गुंतवले, तर तुम्हाला वर्षाला 2,46,000 व्याज मिळणार आहे म्हणजेच दर तीन महिन्यांनी ₹61,500 शिवाने रक्कम तुमच्या खात्यावरती जमा होईल. हे पाच वर्षे सुरू ठेवल्यास फक्त व्याजातून ₹12,30,000 इतकी मिळवता येते. म्हणजे शेवटी तुम्हाला एकूण मिळकत होते ₹42,30,000
अधिक उदाहरण बघा
₹15 लाख गुंतवणुकीवर पाच वर्षात व्याज – ₹6,15000 रुपये तर तिमाही व्याज -₹30,750 एकूण मॅच्युरिटी रक्कम -₹21,15,000
कोण करू शकतो गुंतवणूक?
ज्येष्ठ नागरिक म्हणजे साठ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे नागरिक SCSS मध्ये गुंतवणूक करू शकतात. काही विशेष प्रकरणांमध्ये, सरकारी कर्मचारी जर VRS घेत असतील तर वयोमर्यादा अटींमध्ये शिथिलता दिली जाते. एकट्या किंवा संयुक्त खाते उघडता येता. बँकखात्याच्या तुलनेने अधिक सुरक्षित व स्थिर परतावा मिळतो.
तुमचं निवृत्त आयुष्य आर्थिक दृष्ट्या आनंदी बनवा
निवृत्तीनंतर अनेकांच्या उत्पन्नाचे स्त्रोत बंद होतात, पण खर्च सुरूच राहतो. अशावेळी SCSS सारखी योजना तुम्हाला नियमित, निश्चित आणि सुरक्षित उत्पन्न देते. यामध्ये मिळणारे व्याज रक्कम इतकी ठराविक असते की तुमचं मासिक बजेट आरामात प्लॅन करू शकता. यामुळे, म्हातारपणी कोणत्याही अडचणी शिवाय आर्थिक स्वालंबन टिकवता येते.
पोस्ट ऑफिस ची ही योजना आजच्या घडीला निवृत्त नागरिकांसाठी एक सुवर्णसंधी आहे. सुरक्षितेचे हमी, दर तीमाहीला मिळणारे ठराविक व्याज, एफडी पेक्षा जास्त रिटर्न आणि कर सवलतीचे फायदे यामुळे ही योजना अत्यंत लोकप्रिय ठरत आहे. तुम्ही जर निवृत्तीनंतर पैशांची योग्य गुंतवणूक कुठे करायचे असा विचारत असाल, तर SCSS हा पर्याय जरूर विचारात घ्या, फक्त पाच वर्षात व्याजातून 12 लाखाहून अधिक कमाई हे कुठल्याही इतर योजने सहज देऊ शकत नाही!
हे पण वाचा | ज्येष्ठ नागरिकांच्या नावाने बँकेत FD करा आणि मिळवा दुप्पट नफा; जाणून घ्या सविस्तर माहिती