Pan Card हरवलय का? चिंता नको! ऑनलाइन डुप्लिकेट पॅन कार्ड साठी अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत जाणून घ्या

PAN card online download : आजच्या डिजिटल युगात प्रत्येक नागरिकाकडे आधार, मतदान कार्ड पॅन कार्ड अशा महत्त्वाच्या कागदपत्रांची नोंद असणे आवश्यक असते. त्यातलाच एक महत्त्वाचं ओळखपत्र म्हणजे पॅन कार्ड कायमचा खाते क्रमांक जो फक्त आयकर खाते नव्हे तर बँकिंग गुंतवणूक सरकारी योजनेमध्ये देखील अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पण जर काही पॅन कार्ड हरवलं, चोरी गेलं, कधी कुठे पडून गेलं, तर मग बोंबच. अशावेळी अनेक जण गोंधळून जातात. पण काळजी करू नका, कर्नाटक तुम्ही ऑनलाईन डुप्लिकेट पॅन कार्ड घरबसल्या सहज अर्ज करू शकता. PAN card online download

बहुतेक वेळा ग्रामीण भागात किंवा लहान शहरांमध्ये लोक कागदपत्र सांभाळण्यात थोमाबहुतेक वेळा ग्रामीण भागात किंवा लहान शहरांमध्ये लोक कागदपत्र सांभाळण्यात थोडं मागे पडतात. कुठेतरी बँकेच्या फाईल मध्ये ठेवलेलं असतं, तर कधी कधी जुन्या कपड्यांच्या खिशात, आणि जेव्हा एखादी महत्त्वाची कामगिरी आली की, मग सगळ्यात घरात शोधा शोध सुरू होते. पण आता तसा वेळ गेला. कारण आता फक्त मोबाईल किंवा संगणकावरून काही मिनिटात तुमचं हरवलेले पॅन कार्ड पुन्हा मिळवता येणार आहे

पॅन कार्ड का गरजेचं असतं?

पॅन कार्डचा उपयोग फक्त आयकर भरताना नव्हे, तर अनेक सरकारी आणि खाजगी सेवांमध्ये देखील होतो. बँकेत नवीन खाते उघडणार, 50000 पेक्षा जास्त रक्कम किंवा काढणे, FD/ RD कर्ण, विमा योजना, शेअर बाजारात गुंतवणूक, PF खाते, एलआयसी किंवा पोस्ट ऑफिस मध्ये डिपॉझिट करणे हे सगळं करताना पॅनकार्डाची गरज लागतेच. काही योजना अशा आहेत की, त्यात पॅन कार्ड नसेल तर अर्जच होणार नाही. त्यामुळे तुमचं पॅन कार्ड हरवलं असेल, तर एक मिनिटात तुम्ही डुप्लिकेट पॅन कार्ड काढू शकता.

डुबलीकेट पॅन कार्ड काढण्यासाठी ऑनलाईन प्रोसेस कशी आहे?

तुमचं पॅन कार्ड हरवलं असल्यास खालील स्टेप फॉलो करा:

  • सर्वात प्रथम NSDL किंवा Income Tax India ची अधिकृत वेबसाईट उघडा (https://www.onlineservices.nsdl.com/paam/ReprintDownloadEPan.html)
  • त्यानंतर “Reprint of Pan Card” किंवा “Duplicate PAN Card” असा पर्याय निवडा.
  • तुम्हाला तुमचा पॅन क्रमांक, आधार क्रमांक आणि जन्मतारीख टाकावी लागेल. ही माहिती अगदी बरोबर भरली पाहिजे.
  • नंतर “Terms and Conditions” मान्य करा, कॅप्चा कोड टाका आणि सबमिट करा.
  • आता तुमचं पॅन कार्ड डिटेल स्क्रीनवर दिसतील. जिथे तुमचा पत्ता व पिन कोड नीट तपासा.
  • जर सर्व माहिती बरोबर असेल, तर पुढे जाऊन फीस भरा. डुप्लिकेट साठी साधारण पन्नास रुपये शुल्क आकारला जातो.
  • पेमेंट यशस्वी झाल्यानंतर, तुमचा पॅन कार्ड काही दिवसातच पोस्ट आणि तुमच्या पत्त्यावरती पोहोचेल.

हि संपूर्ण प्रक्रिया केव्हा दहा ते पंधरा मिनिटांची आहे आणि सर्वसामान्य माणूस सुद्धा कोणत्याही सायबर कॅफे शिवाय घरी बसून करू शकतो. जर तुमच्याकडे इंटरनेट असेल तर ही प्रक्रिया एकदम सोपी आहे. तुमच्याकडे इंटरनेट नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या सुविधा केंद्रात जाऊन किंवा CSC केंद्रातून ही हे काम करून घेऊ शकता.

पॅन कार्ड नसल्याचा काय धोका होतो?

हे लक्षात घ्या की, अगर तुमचे पॅन कार्ड बँक खाते लिंक नसेल, आणि वर्षभरात त्या खाद्यावरती तुला हजार रुपये किंवा त्याहून अधिक व्याज जमा झालं, तर मग तुमच्याकडून 30% TDS कपाट करेल. जर पॅन कार्ड लिंक असेल तर फक्त 10% TDS कट होतो. याचा अर्थ पॅन कार्ड नसल्यामुळे 20% अतिरिक्त रक्कम तुमच्या खात्यामधून कपात होणार आहे. नंतर तुम्ही तरी पण मागायला जाल तर काही जास्त लोकांना त्याची पद्धत माहीत नसते. त्यामुळे पॅन कार्ड ही एक गोष्ट कधी हलक्यात समजून नका.

डुबलीकेट पॅनकार्डचे फायदे काय ?

मूळ कार्ड हरवलेलं असताना अधिकारिक ओळख टिकवता येते,

बँक, investment, पोस्ट ऑफिस , एलआयसी सारख्या योजनेचा लाभ घेता येतो. कोणतीही अडचण नाही आता टीडीएस किंवा जीएसटी मध्ये सुविधा उपयोग करता येतो. आताही पॅन सुद्धा उपलब्ध असल्याने डिजिटल स्वरूपात कार्ड कायम तुमच्याजवळ राहू शकत.

अर्ज करताना फोटो व सिग्नेचर अपडेट करण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे.

ई- पॅन म्हणजे काय ?

आज-काल E-PAN कार्ड एक नवीन स्वरूपात लोकांच्या पसंतीला उतरतय. म्हणजे, जर तुम्हाला मूळ कार्डाची प्रति पोस्टाने हवे नसेल, तर फक्त डिजिटल स्वरूपात ही हे कार्ड तुम्ही डाऊनलोड करू शकता. हे E-PAn कार्ड पीडीएफ स्वरूपात तुमच्या मेलवर येतो आणि त्यावर क्यूआर कोड नाव जन्मतारी प्यान क्रमांक फोटो आणि सिग्नेचर असत.

ई – pan कार्ड इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकृत वेबसाईटवरून मुक्त कुठल्याही फुलका शिवाय मोफत डाऊनलोड करता येतात. फक्त तुम्हाला आधार क्रमांक आणि ओटीपी आवश्यक असतो.

पॅन कार्ड हरवले? मंग आता हे करा

सर्वात प्रथम, कोणत्याही चुकीच्या वापरापासून वाचवण्यासाठी एफ आय एफ गुणा नोंद करा.

त्यानंतर, NSDL किंवा UTIITSL वेबसाईट वरती जाऊन डुबलीकेट फॅन साठी अर्ज करा. तुमच्या पत्त्याची पडताळणी करा आणि पैसे भरा. पोस्ट ऑफिस ने काही दिवसात तुमच्याकडे पॅन कार्ड पोहचेल.

पॅन कार्ड हरवले तर गोंधळ घालण्याची गरज नाही. त्यासाठी आता सरकारची यंत्रणा खूप सोपे आहे पारदर्शक झाले आहे. ऑनलाइन अर्ज केल्यावर, फक्त काही मिनिटात तुमचं डुप्लिकेट पॅन कार्ड मिळत आहे. आजची ही प्रक्रिया करून घ्या आणि आर्थिक व्यवहारांमध्ये होणारा त्रास टाळा. सरकारने दिलेली ही सुविधा सर्वसामान्य लोकांसाठी मोठा दिलासा देणारी आहे. त्यामुळे पॅन कार्ड हरवलं तरी काळजी नको! कारण ऑनलाईन उपाय आहे तुमच्या हातात.

हे पण वाचा | SBI अंतर्गत राबवण्यात येत आहे भन्नाट योजना; नागरिकांना मिळणार 24,904 रुपये, जाणून घ्या संपूर्ण योजना

Leave a Comment

error: Content is protected !!