24 Carat Gold Rate Today: सोने खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. गेल्या जवळपास आठवडाभर सातत्याने सोन्याच्या किमतीत वाढ होत होती. मात्र आज सोन्याच्या किमतीमध्ये मोठी घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकेने जपान सारख्या अनेक व्यापारी भागीदारांशी नवीन करार केला आहे. या करारामुळे सोन्याच्या मागणीत घट झाली आहे. त्यामुळे सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून पाहिले जाणाऱ्या सोन्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. याचाच परिणाम म्हणून सोन्याच्या दरात लक्षणीय घट झाली आहे.
एकाच दिवसात किंमत झाली इतकी कमी..
बुधवारी 24 कॅरेट सोन्याचा दर 102330 रुपये प्रति दहा ग्राम एवढा होता. पण आज गुरुवारी 24 जुलै रोजी यामध्ये 1360 रुपयाची मोठी घसरण झाली आहे. आज नवीन दर 100970 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे. त्याचबरोबर गेल्या आठवड्याभरात किमती वाढल्यामुळे व्यापाऱ्यांनी नफा कमवला असल्याने भारतातील सोन्याच्या किमती ही कमी झाल्या आहेत. तुम्ही देखील सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची ठरू शकते. कारण सोने खरेदी करण्यापूर्वी सध्या बाजारातील सोन्याचे दर काय आहेत हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे ठरते.
हे पण वाचा| दरमहा फक्त ₹210 गुंतवा अन् 5,000 रुपयांची पेन्शन मिळवा; जाणून घ्या काय आहे अटल पेन्शन योजना?
आजची सोन्याची किंमत
- आज 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम मागे 1360 रुपयांनी घसरला आहे. त्यामुळे आज 24 कॅरेट सोने 100970 रुपयावर येऊन पोहोचले आहे.
- याच वेळी 22 कॅरेट सोन्याच्या किमतीमध्ये आज 1250 रुपयाची घसरण झाली आहे. त्यामुळे 22 कॅरेट 10 ग्रॅम सोने खरेदी करण्यासाठी 92 हजार 550 रुपये लागत आहेत.
- त्याचबरोबर 18 कॅरेट सोन्याचा भाव देखील 1020 रुपयांनी घसरला आहे. 18 कॅरेट सोनी खरेदी करण्यासाठी 75,730 रुपये प्रति दहा ग्राम एवढे लागत आहेत.
तुमच्या शहरातील आजचे सोन्याचे दर
- मुंबई चेन्नई, कोलकाता, बेंगलोर, हैदराबाद, केरळ आणि पुणे यासारख्या प्रमुख शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचे किंमत प्रति एक ग्रॅम 10097 रुपये एवढी आहे.
- राजधानी दिल्लीत आज 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रतिद 1 ग्रॅम 10112 रुपये एवढी आहे.
- वडोदरा आणि अहमदाबाद मध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 1 ग्रॅम 10102 रुपये एवढी आहे.
हे पण वाचा| SBI ची 444 दिवसांची अमृत वृष्टी FD योजना बनवणार मालामाल! ₹4 लाखांच्या गुंतवणुकीवर मिळणार जबरदस्त परतावा..
चांदीच्या दरातही घसरण
सोन्या सोबतच चांदीच्या किमतीत देखील मोठी घट झाली आहे. दोन दिवसाच्या वाढीनंतर आज चांदीच्या किमतीमध्ये एक हजार रुपयाची घसरण झाली आहे. सध्या भारतात एक किलो चांदी ची किंमत एक लाख 18 हजार रुपये एवढी आहे. तर भारतात 100g चांदीची किंमत शंभर रुपयांनी घसरून 11800 रुपये झाली आहे. या घसरणीमुळे सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्यांना उत्तम संधी निर्माण झाली आहे. तुम्ही देखील अनमोल धातू खरेदी करू इच्छित असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. 24 Carat Gold Rate Today
1 thought on “सोनं झालं स्वस्त! एका झटक्यात इतक्या रुपयाने घसरल्या किमती? पहा तुमच्या शहरातील नवीन दर..”