12th Result Date 2025: प्रतीक्षा संपली! उद्या लागणार बारावीचा निकाल इथे पहा वेबसाईटवर

12th Result Date 2025 : राज्यातील लाखो विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या पालकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी मार्च 2025 मध्ये घेतलेले इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या म्हणजे सोमवारी 5 मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. अनेक आठवडे यांची प्रतीक्षा अखेर संपली असून विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी हा निकाल फारच निर्णायक ठरणार आहे.

या तीन वेबसाईटवर पाहता येणार निकाल

यंदा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर केला जाणारा असून विद्यार्थ्यांना खालील दिलेल्या संकेतस्थळावरून निकाल पाहता येणार आहे.

http://hscresult.mkcl.org

https://results.navneet.com

https://results.targetpublications.org

या ठिकाणी वेबसाईटवर विद्यार्थ्यांना फक्त आपला सीट नंबर आणि जन्मतारीख भरावी लागेल आणि काही क्षणात निकाल स्क्रीनवर दिसेल.

मंडळांनी यावर्षी एक महत्त्वाचा बदल केला आहे दरवर्षी मार्च महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात सुरू होणारी बारावीची परीक्षा यंदा 11 फेब्रुवारी 2025 ते 11 मार्च 2025 या कालावधीत घेण्यात आली. तांत्रिक बाबी, मूल्यांकन, उत्तर पत्रिकांचे तपासणी याची तयारी वेळेत पार पाडून मंडळाने निकाल वेळ आधी जाहीर करण्याचे मोठे पाऊल उचलला आहे.

यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी सुमारे 15 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. हे विद्यार्थी विज्ञान, कला, वाणिज्य, व्यवसायिक आणि अभ्यासक्रम, आयआयटी संलग्न अभ्यासक्रम इत्यादी विविध शाखेंमधून परीक्षेला बसले होते. त्यामुळे हा निकाल फक्त शैक्षणिक नव्हे, तर लाखो कुटुंबाच्या भविष्याचा निर्धार करणारा क्षण आहे.

गेला काही दिवसांपासून आणि फेक न्युज सोशल मीडिया वरती पसरत होत्या. कुणी म्हणत होता तीन मेला निकाल लागेल, कुणी साथ मे म्हणत होतं. पण आता स्वतः महाराष्ट्र बोर्डा करून अधिकृत सूचना जाहीर करण्यात आली असून, निकाल सोमवारी म्हणजे 5 2025 रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन उपलब्ध होणार आहे.

हे पण वाचा | HSC SSC Result Dates : इयत्ता दहावी व बारावीचा निकाल या तारखेला होणार जाहीर? वाचा सविस्तर माहिती

Leave a Comment

error: Content is protected !!