10th Result Date 2025 : आली रे आली मोठी बातमी समोर आली. बारावीचा निकाल लागल्यानंतर आता साऱ्या पालकांना एकच उत्सुकता लागली आहे ती म्हणजे दहावीचा निकाल कधी लागणार,? शाळा संपल्यानंतर परीक्षा झाल्या, मग थोडा आराम मिळाला खरा; पण आता निकालाच्या दिवसाची वाट सगळेच जण पाहत आहेत. कारण ही वेळ आहे जिथून आयुष्याचं वळण सुरू होतं. कुणी विज्ञानाच्या वाटेवर चालायला निघतो, तर कुणी वाणिज्य खुणावत, तर कोणी डिप्लोमा च्या दिशेने वाटचाल सुरुवात करतो. आणि सगळ्याची पहिली पायरी म्हणजे दहावी निकाल. 10th Result Date 2025
अनेक दिवसापासून विद्यार्थी आणि पालकांच्या माध्यमातून दहावीचा निकाल कधी लागणार चा प्रश्न उपस्थित केला जात होता. दहावीचा निकाल 15 मे च्या आत लागण्याची शक्यता आहे. शालेय शिक्षण मंडळाकडून अजुन अधिकृत तारीख जाहीर झाली नसली तरी मात्र तयारी सुरू आहे. निकाल लागल्यावर सर्वच विद्यार्थ्यांनी पालक घाईघाईने वेबसाईटवर जातात, त्यामुळे थोडी गडबड होऊ शकते. म्हणूनच आधीच संपूर्ण माहिती लक्षात ठेवलेली बरी.
निकाल कुठे पाहणार?
निकाल जाहीर झाल्यानंतर तो पाहिला खालील दिलेल्या वेबसाईट लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला कोणते अडचण येणार नाही एखादी वेबसाईट जास्त लोड आल्यामुळे बंद पडली तर दुसरी वेबसाईट वापरू शकता.
- mahresult.nic.in
- mahahsscboard.in
- msbshse.co.in
- mh-ssc.ac.in
- sscboardpune.in
यावर दिलेल्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचा सीट नंबर आणि आईचे नाव भरून रिझल्ट पाहू शकता. इंटरनेटची स्पीड आणि साईटचा लोड यामुळे कधी कधी साईट उघडायला वेळ लागू शकतो, पण काळजी करू नका.
विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचे, निकाल नंतर नंबर महत्त्वाचे असतात, पण हे नंबर आयुष्यात नाहीत. चुकलं, पडलं, तर त्यातून काहीतरी शिकायला मिळतं. आणि जे मिळाले, तेथूनच काहीतरी घडवता येते. म्हणून जो मिळेल निकाल, तो स्वीकारा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढचं पाऊल योग्य दिशेने टाका.
दहावीच्या यशाच्या वाटेवर तुमच्या सगळ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!
हे पण वाचा | दहावी बारावीची निकालाची तारीख जाहीर! बारावीचा निकाल 13 मे तर दहावीचा निकाल या दिवशी लागणार