10th Result 2025 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल अध्यक्ष घोषित केलेला नाही, पण निकालापूर्वीच अकरावीच्या प्रवेश प्रक्रिये बाबत एक महत्त्वाचा आणि बालक विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेतलेला आहे. 2025 सालि दहावी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना आता अकरावीच्या प्रवेश साठी घाई किंवा फसवणुकीची भीती वाटायची गरज नाही, कारण संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पार पडणार आहे. 10th Result 2025
बारावीचा निकाल लागल्यानंतर सध्या सगळ्यांचे लक्ष दहावीच्या निकालावर आहे. बोर्डाकडून अद्याप निकाल तारीख जाहीर झाली नसली तरी पुढील दोन आठवड्यात निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा स्थितीत दहावी पास झाल्यानंतर लगेच अकरावीत प्रवेश घेण्यासाठी जे गडबड सुरू होते, त्यासाठी आता बोर्डाने आधीच पावल उचललेली आहेत.
बोर्ड कडून देण्यात आलेल्या अधिकृत माहितीनुसार, कोणत्याही माहिती किंवा जाहिरात अनधिकृत संकेतस्थळावर दिसली, तरीही त्यावर विश्वास ठेवू नका. अकरावी प्रवेश साठी फक्त अधिकृत संकेतस्थळावरच लॉगिन करून प्रक्रिया पूर्ण करा.
शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरती अखेरत्या असून, इथूनच संपूर्ण प्रवेश प्रक्रिया पार पडणार आहे. कोणत्याही खाजगी किंवा अनअधिकृत संकेतस्थळावरून माहिती घेतल्याने फसवणूक होण्याची शक्यता आहे, असा इशाराही बोर्ड कडून देण्यात आलाय.
बोर्डाने पोस्ट केले आहे की, काही अनधिकृत संकेतस्थळ, सोशल मीडियावरती फेक जाहिराती, youtube चैनल किंवा खाजगी संस्थांकडून दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात आहे. अशा कोणत्याही माहितीला बळी न पडता फक्त शासनाचे अधिकृत वेबसाईट आणि शाळेच्या सूचना यावरच विश्वास ठेवावा.
दहावीचा निकाल अजून तरी लागला नसला, तरी अकरावीच्या प्रवेश प्रक्रिया अधिक सुबक, सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी बोर्ड कडून सकारात्मक पावले उचलली जात आहेत. पालक आणि विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा आणि चुकीच्या मार्गापासून सावध राहावं, हेच या निर्णयाचे उद्दिष्ट आहे.
हे पण वाचा | दहावी बारावीची निकालाची तारीख जाहीर! बारावीचा निकाल 13 मे तर दहावीचा निकाल या दिवशी लागणार