10th pass job : नोकरी शोधताय? पण शिक्षण कमी तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे तुम्ही जर दहावी पास असाल तर तुम्ही थेट बँकेत नोकरी करू शकता. तुम्हाला बँकेत सरकारी नोकरी करण्यात इच्छा असेल तर ही संधी वाया घालू नका. देशातील प्रमुख बँकिंग पैकी एक असलेल्या बँक ऑफ बडोदा मार्फत तब्बल 503 पदांसाठी शिपाई वर्गातील भरती जाहीर करण्यात आलेली आहे. विशेष बाब म्हणजे यामध्ये महाराष्ट्रासाठी स्वतंत्रपणे 29 जागा राखीव असून, सैनिक भाषेत इंडियन असलेल्या तरुणांना येथे प्राधान्य देण्यात येणार आहे. 10th pass job
23 मे पर्यंत अर्ज करा
सदर भरती प्रक्रियेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे 23 मे 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे त्यानंतर एक ही अर्ज स्वीकारला जाणार नाही, त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी उशीर न करता त्वरित अर्ज भरावा. अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे गावाकडच्या तरुणांनी सायबर कॅफे किंवा मोबाईलच्या माध्यमातून सहज अर्ज करता येणार आहे.
503 पैकी महाराष्ट्राला 29 जागा – स्थानिक भाषेचे ज्ञान आवश्यक
या भरतीत देशातून विविध राज्यांमध्ये पद जाहीर करण्यात आली असून महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी 29 पदं उपलब्ध आहेत. बँकेच्या नियमानुसार, उमेदवाराला त्या स्थानिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यामुळे मराठी भाषेतील संवाद, वाचन व लेखन कौशल्य असणे गरजेचे ठरणार आहे.
पात्रता – वयोमर्यादा आणि शैक्षणिक अट
या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवारांनी किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याशिवाय वयाची मर्यादा 18 ते 26 वर्षापर्यंत आहे. म्हणजे, 01 मे 1999 नंतर जन्म झालेला उमेदवाराच या भरतीसाठी पात्र आहे आरक्षित प्रवर्गातील उमेदवार शासन मान्य सवलती लागू राहतील.
अर्ज फी :
या भरतीसाठी अर्ज करताना सामान्य ओपन प्रवर्गातील उमेदवारांना सहाशे रुपये फील भरावी लागेल, तर अनुसूचित जाती जमाती, महिलांसाठी व अपंग उमेदवारांसाठी केवळ शंभर रुपये शुल्क आकारला जाईल. ही fee ऑनलाइनच भरावी लागेल.
निवड प्रक्रिया :
उमेदवार निवड ऑनलाइन चाचणी व नंतर कागदपत्र पडताळणीच्या आधारित केली जाणार आहे त्यामुळे ज्यांनी दहावी उत्तीर्ण केली असून, सामान्य ज्ञान, गणित, भाषा आदी विषयात सराव केलेला आहे, त्यांनाही परीक्षा सहजपणे जमू शकते.
पगार किती मिळणार :
या शिपाई पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 19500 ते 38 हजार 815 रुपये पर्यंत पगार मिळणार आहे. याशिवाय इतर भत्ते, मेडिकल सुविधा, भविष्य निर्वाह निधी, पेन्शन सारख्या सरकारी लाभांचाही समावेश असेल. गावाकडील तरुणांसाठी ही एक नोकरी म्हणजे स्थैर्यच प्रतिष्ठेचा स्वप्न पूर्ण करणारी संधी आहे.
हे पण वाचा : नोकरीची सुवर्णसंधी; कोणतीही परीक्षा नाही डायरेक्ट नोकरी, पगार मिळणार 24000 रुपये, वाचा सविस्तर
Job